www.24taas.com,पुणे
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्हातल्या श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलीये. बंटी जहागीरदार असं या आरोपीचं नाव आहे.
जहागीरदार यानं पुणे बॉम्बस्फोटातल्या आरोपींना त्यानं शस्त्र पुरवल्याचा संशय आहे. मुंबई एटीएसनं नगरमध्ये ही कारवाई केली. त्याचा प्रत्यक्ष बॉम्बस्फोटांत सहभाग नव्हता. मात्र आरोपींना शस्त्र पोहचवण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती.
मुंबई एटीएसच्या टीमनं बंटी जहागीरदारला मुंबईत आणलं असून आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. बंटी जहागीरदारकडं २००३मध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडली होती. पुणे साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आलीये.