कृष्णा खोरे चौकशी अहवाल ‘गायब’

कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 24, 2013, 12:17 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलाय.
युती सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या कृष्णा खोरे महामंडळात हजारो कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करुन १९९९ मध्ये अहवाल सरकारला दिला. मात्र गेल्या १४ वर्षात हा अहवाल गायब झाल्यानं कोणतीही कारवाई झाली नाही.
आरटीआय कार्यकर्ते पोपट कुरणे यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केला. मात्र त्यात यश मिळत नसल्यानं त्यांनी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर चौकशी अहवाल गायब झाल्याची बाब उघड झालीय. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रत्नाकर गायकवाड यांनी दिलेत. तसंच ३१ ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनाच पाचारण करण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.