www.24taas.com, मुंबई
मनसेच्या वर्धापनदिनी बाळा नांदगावकरांच्या खुमासदार भाषणाने चांगलीच बहार आणली... ‘वहिनी साहेबांच्या रागावर कंट्रोल ठेवतात अशी मजेशीर टिप्पणी त्यांनी राज ठाकरेंवर केली... साहेब कधी कधी चिडतात.. वहिनीवर चिडू नका साहेब.. गेल्या दुष्काळात वहिनींनी लीड केलं.’
‘संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. आमच्या वहिनी छोट्या छोट्या गोष्टी संभाळतात.. आम्ही आजवर अनेक पुढारी पाहिले आणि त्यांच्या बायकाही पाहिल्या..’ असं म्हणताच उपस्थितींमध्ये एकच हास्यकल्लोळ पसरला... अगदी राज ठाकरेंनाही आपलं हासू आवरलं नाही... त्यानंतर राज ठाकरे ह्यांनी देखील मिश्किल शैलीत बाळा नांदगावकर यांना उत्तर दिलं.
‘आमचा बाळा काय काय पाहतो माहित नाही मला, मी गेल्या सात वर्षापासून तर पक्षच पाहतो आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी चांगलाच विनोद केला. ‘आणि हे लोकं जातात तर एकटेच जातात मला कुठेही घेऊन जात नाही.. एक एकटे पाहून येतात.’ असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांची चांगलीच विकेट काढली.