राज ठाकरे अजून लहान आहेत - शरद पवार

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अशा पोरकट टीकांवर लक्ष द्यायचं असतं का? दुष्काळाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहे ते महत्त्वाचे आहेत.

Updated: Feb 24, 2013, 11:43 AM IST

www.24taas.com, सातारा
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अशा पोरकट टीकांवर लक्ष द्यायचं असतं का? दुष्काळाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहे ते महत्त्वाचे आहेत. असले प्रश्न महत्त्वाचे आहेत का? असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर पवारांनी भाष्य करण्याचं टाळलं.
‘राज ठाकरे हे लहान आहेत. त्यांच्या पोरकट प्रश्नांना उत्तरं द्यायची गरज नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी राज यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करायचं टाळलं आहे. राज ठाकरेंच्या टीकेपेक्षा इतरही विषय आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी त्या विषयाला बगल दिली.
शुक्रवारी सोलापुरमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार तसंच अजित पवार यांच्यावर टीका केली होती. तसंच शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारसमोर मांडणार असल्याचंही शरद पवार म्हणाले.
तर दुसरीकडे मुलांचे शाही लग्न करणारे आमदार भास्कर जाधव यांची देखील पाठराखण केली आहे. भास्कर जाधवांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. त्यामुळे आपण हा विषय काय सारखा काढता आहात असेही शरद पवार म्हणाले.