कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

टीम इंडियाचा माजी क्रिकेटरआणि आयपीएलचा दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन झहीर खानचा साखरपुडा झाला. झहीरने याची घोषणा केली, झहीरचा 'चक दे' फेम गर्लफ्रेन्ड सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 25, 2017, 02:19 PM IST
कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटरआणि आयपीएलचा दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन झहीर खानचा साखरपुडा झाला. झहीरने याची घोषणा केली, झहीरचा 'चक दे' फेम गर्लफ्रेन्ड सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाला.

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेने झहीर खान आणि सागरिकाला लग्न ठरल्यावर शुभेच्छा दिल्या, पण अनिल कुंबळेने सागरिका घाटगेला सोडून, पत्रकार सागरिका घोषला टॅग केलं.

फक्त अनिल कुंबळेचं नाही, दिल्ली डेअरडेविल्सनेही चुकून सागरिकाला टॅग केलं, यानंतर सागरिका घोषने सर्वांचा गैरसमज दूर केला, यानंतर कुंबळे आणि दिल्ली डेयरडेविल्सला टॅग करून लिहिलं, तुम्ही ज्या सागरिकाला टॅग केलं आहे, ती दोन मुलांची आई आहे. सागरिका घोष पत्रकार राजदीप सरदेसाई यांची पत्नी आहे.

'चक दे' सिनेमात सागरिकाने हॉकी खेळाडू प्रीति सबरवालची भूमिका केली होती, भूमिकेत प्रीति सबरवाल क्रिकेटरशी लग्न करण्यास नकार देते, मात्र आता सत्यात सागरिकाने क्रिकेटरला जीवनसाथी निवडलं आहे.

झहीर खानने पोस्ट करताना लिहिलं, आपल्या पत्नीच्या पसंतीवर कधी हसू नये, कारण आपणही तिचीच पसंती असतो, पुढे लिहिलंय, जीवनसाथीसोबत...

सागरिकाने स्वत: देखील सोशल मीडियावर याची घोषणा केली, झहीर आणि सागरिकाला या पोस्टनंतर सोशल मीडियावर खुप साऱ्या शुभेच्छा मिळाल्या.