नवी दिल्ली : इतर लोक ज्यांचे मोठे फॅन आहेत ते बॉलिवूडचे स्टार्स आमिर खान, दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार 'आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग'ची (आयपीटीएल) एक मॅचसाठी मैदानात पोहचले आणि त्यांनी इथं दिग्गजांसोबत एक मॅचही खेळली. प्रेक्षकांनाही यामुळे एक सुखद धक्का पोहचला.
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांना खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित झाले होते. पण, इंडियन एसेस आणि यूएई रॉयल्समध्ये होणाऱ्या मॅचपूर्वी त्यांना बॉलिवूड स्टार्सनाही खेळताना पाहण्याची संधी मिळाली.
आमिर आणि फेडरर कोर्टच्या एका बाजुला तर सानिया मिर्झा आणि जगभरात नंबर वन असलेला खेळाडू नोवाक जोकोविच दुसऱ्या बाजुला उभे ठाकले. जोकोविचचे कोच बोरिस बेकर यांनीही या अनोख्या मॅचचा पुरेपूर आनंद घेतला.
आमिरनं या दिग्गजांसोबत खेळण्याचा सर्वात जास्त वेळ आनंद घेतला. दीपिका पादुकोण, अक्षय आणि रितेश देशमुख हेदेखील त्यानंतर खेळण्यासाठी सहभागी झाले.
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सुनील गावसकर हेदेखील ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित होते. गावसकर हे इंडियन एसेसचे सहमालक आहेत त्यामुळे ते तीनही दिवस मॅचसाठी उपस्थित होते.
तसंच, ही मॅच पाहण्यासाठी मोहम्मद अझरुद्दीन आणि लारा दत्ता हेदेखील उपस्थित होते. अभिनेत्री लारा दत्ता ही आयपीएटीलचा संस्थापक महेश भूपती याची पत्नी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.