पुणे : दिल्ली डेअरडेव्हिल्सचा फास्ट बॉलर डोमनिक जोसेफ मुत्तूस्वामीची जिद्दी खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या आजवरचा प्रवास तो धडपड्या आहे याची जाणीव करून देण्यास पुरेसा आहे.
एके काळी पुण्याच्या एका फॅक्टरीत काम करणाऱ्या मुत्तूस्वामीने विचार केला नसेल की आपल्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल... बंदुकीच्या गोळ्या बनवल्या जाणाऱ्या कंपनीत मुत्तूस्वामी काम करतो.
'मी सुरूवातीला स्थानिक खेळाडुंसोबत खेळत होतो. कधी वाटलंही नव्हतं की आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. विदेशी खेळाडुंविरूद्ध कशी बॉलिंग करायची हे मला झहीर खाननं शिकवलं... यासाठी झहीर भाईची खूपच मदत झाली' असं मुत्तूस्वामीनं म्हटलंय.
पुण्यात जन्मलेला मुत्तूस्वामी 'आयपीएल सीझन-८'मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतो... त्यानंतर पुण्यातील एका आयुध फॅक्टरीतही तो काम करतो.
मुत्तूस्वामी नोव्हेंबर २०११ मध्ये पहिली घरगुती मॅच खेळला होता. त्यानंतर १५ एप्रिलला आयपीएलमधील पहिली मॅच किंग्स इलेव्हन पंजाबविरूध्द खेळला. त्याने २०१४-१५ मध्ये रणजीत खेळताना ७ मॅचमध्ये २२ विकेट घेतल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.