धोनीच्या विजयाचं गुपित तुम्हीही करा आत्मसात

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेहमीच टीम इंडिय़ाला संकटातून बाहेर काढत असतो, धोनीचे निर्णय टीम इंडियाला विजयाकडे घेऊन जातात. हे धोनीला कशामुळे शक्य होत आहे, एक चांगला टीम लीडर होण्यासाठी धोनीचे काही महत्वाचे फॉर्म्युले जाणून घेणे महत्वाचे आहे.

Updated: Mar 28, 2016, 10:28 AM IST
धोनीच्या विजयाचं गुपित तुम्हीही करा आत्मसात title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेहमीच टीम इंडिय़ाला संकटातून बाहेर काढत असतो, धोनीचे निर्णय टीम इंडियाला विजयाकडे घेऊन जातात. हे धोनीला कशामुळे शक्य होत आहे, एक चांगला टीम लीडर होण्यासाठी धोनीचे काही महत्वाचे फॉर्म्युले जाणून घेणे महत्वाचे आहे.

कॅप्टन कूल

धोनी कधीही संतापत नाही, एक संयमी कॅप्टन असल्याने धोनीला कॅप्टन कूल म्हणतात, पण कूल असल्यानेच धोनीच्या चेहऱ्यावर कधीही प्रेशर दिसत नाही.

टीम इंडियाच्या कॅप्टनचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे शांतपणे विचार करून तोडगा काढणे, हा गुण क्रिकेटच नाही, तर इतर क्षेत्रातील मंडळींसाठीही महत्वाचा आहे. धोनीतील सर्वात महत्वाचा गुण हा शांतपणा आहे, अशी कबुली काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने दिली होती.

इगोचं भूत मानगुटीवर बसूच देत नाही

धोनीचा स्वतःवर विश्वास प्रचंड विश्वास आहे, पण अहंकारात येऊन तो कोणताही निर्णय घेत नाही, धोनी आपला इगो बाजूला सारून सहाव्या-सातव्या क्रमांकावर बॅटिंगला येतो, मोठ्या आव्हानाच्या प्रतिक्षेत तो नेहमी असतो. इगो नावाचं भूत ज्याच्या मानगुटीवर बसलंय, त्यात कोणता व्यक्ती सुटला असेल तर नवलच.

विकेटकिपरची नजर

धोनी विकेटकिपर असल्याने तो बॉलर आणि बॅटसमनची क्षमता आणि कमजोरी लगेच ओळखतो. बॉल चांगला स्पिन किंवा स्विंग होतोय किंवा नाही यावर त्याची नजर असते. बॉल चांगली स्पिन किंवा स्विंग होत नसेल तर दुसऱ्या एंडने ओव्हर टाकण्यास सांगतो. अश्विन आणि नेहराच्या बाबतही असेच केले आहे.

टीममधील प्रत्येकाची किंमत ओळखतो

कोण हुकूमी एक्का आहे, कोण काय करू शकतो, जे मी करू शकत नाही, ते कोण करू शकतं हे धोनीला माहित आहे. बॉलिंगमध्ये जेव्हा धोनी संकटात असतो तेव्हा अश्विनला बोलवतो. अश्विनचा योग्य वापर करणे धोनीला जमतं.

आत्मविश्वास ढासळणार नाही याकडे लक्ष

धोनी खेळाडूला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी खूप वेळ देतो, खेळ चांगला झाला नाही, तरी त्याचा आत्मविश्वास ढासळणार नाही याकडे लक्ष देतो.
धोनीने प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्त बदल केले नाही. जिंकणाऱ्या टीमवर विश्वास टाकला. यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. त्यांना सपोर्ट केले. त्यांच्याकडून चांगले प्रदर्शन घडवून आणले.