धोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड

भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला. 

ANI | Updated: Apr 8, 2015, 10:40 AM IST
धोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड  title=
सौजन्य एएनआय फीड

रांची: भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला. 

नुकताच धोनी रांचीत रस्त्यावर हिरव्या रंगाची बुलेट घेऊन सुरक्षा रक्षकांना न घेता निघाला. या बाईकवर पुढच्या बाजुला नंबर प्लेट नव्हती आणि बाईकचा नंबर मडगार्डवर लिहिलं होतं. धोनीची बाईकवर फिरतांनाचे फोटो मीडियामध्ये आले होते. 

जेव्हा या फोटोंवर ट्रॅफिक पोलिसांची नजर गेली. तेव्हा त्यांना पुढे नंबर प्लेट नाही हे लक्षात आलं आणि त्यानंतर कॅप्टनला घरी चालान पाठवून दंड वसूल केला गेला. धोनी बाईकचा चाहता आहे आणि जेव्हाही त्याला मोकळा वेळ मिळतो. तेव्हा तो एकटाच बाईक राईडवर निघत असतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.