मीरपूर : बांगलादेश विरूद्ध वन डे मालिका गमावल्यानंतर टीकेचा लक्ष्य ठरलेल्या कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने पद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला माजी खेळाडूंनी विरोध केला आहे.
मिरपूरमध्ये दुसरी वनडे गमावल्यानंतर धोनी पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाला, 'माझ्याशिवाय टीम जर चांगली खेळते तर बोर्ड मला कॅप्टनशीपवरून काढू शकतं. मी टीममध्ये नेतृत्वाशिवाय खेळू शकतो.' पराभवाच्या दबावानंतर धोनी असं वक्तव्य केलंय
काही माजी भारतीय क्रिकेट कर्णधार बिशन सिंग बेदी, दिलीप वेंगसरकर आणि अजित वाडेकर तसेच इतर क्रिकेटर चेतन चौहान, चंदू बोर्डे, सैय्यद करमानी आणि किरण मोरे यांनी धोनीला पाठिंबा देत त्याच्या कर्णधारपद सोडण्याला विरोध केला आहे.
वेंगसरकर म्हणाले, मला आता तरी वाटते की धोनीची जागा घेऊ शकतं. त्याने नुकतेच भारताला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचविले होता. ही त्याच्यानंतरची पहिली मालिका आहे. त्याला कर्णधार म्हणून कायम ठेवायला पाहिजे.
भारतीय क्रिकेटबद्दल नेहमी रोखठोक बोलणारे बिशन सिंग बेदी म्हणाले, की भारताच्या खराब कामगिरीचा दोष एकट्या धोनीला देऊन चालणार नाही. संपूर्ण संघाच्या खराब कामगिरीमुळे मालिका गमवावी लागली. अजून काहीही स्पष्ट नाही. मीडियासमोर जे काही बोलला ते नैराश्यातून बोलले आहे.
जेव्हा संघ जिंकतो तेव्हा कर्णधाराची प्रशंसा होती आणि पराभूत झाल्यावर टीका, असे होते आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.