नॉटिंगहम : नॉटिंगहम येथे झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडच्या संघाने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानी गोलंदाजांची जोरदार धुलाई करताना 444 धावांचा डोंगर उभा केला.
इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढले. इंग्लंडकडून अॅलेक्स हेलने सर्वाधिक 171 धावा काढल्या. पाकिस्तानच्या वहाब रियाझच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या संघाने 10 षटकांत तब्बल 110 धावा ठोकल्या.
पाकिस्तानच्या या कामगिरीवर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ट्विट करत पाकिस्तानला चिमटे काढले. इंग्लंडवाले रियाझ कर करे पाकिस्तानकी बजा रहे हे असे त्याने ट्विट केले.
या सामन्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनेही पाकिस्तानच्या गोलंदाजांची खिल्ली उडवली.