नटाल : इटलीचा डिफेंडर जार्जियो चिलिनीनं म्हटलं, की उरुग्वेचा स्ट्राइकर लुई सुआरेजनं वर्ल्डकप ग्रुप डी मॅच दरम्यान त्याच्या खांद्याचा चावा घेतला होता.
चिलीनीनं मॅचनंतर इटलीचं टीव्ही चॅनल 'राइ'ला सांगितलं, "तो मला चावला होता, हे स्पष्ट होतं, माझ्या खांद्यावर त्या चावण्याचा घाव आहे. रेफरीनं आपली शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी लाल कार्ड सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुआरेज नाटक करत होता." इटलीची टीम उरुग्वेकडून 0-1नं पराभूत होऊन टूर्नामेंटमधून बाहेर पडली होती.
चावा घेतल्याच्या एका मिनीटानंतरच उरुग्वेचे डीएगो गोडिननं 81व्या मिनीटाला गोल करून दक्षिण अमेरिका देशातील ग्रृप डीमधून शेवटची 16 वी जागा मिळवली.
तर उरुग्वेचे कोच ऑस्कर तबरेजनं म्हटलं की, मला ही घटना दिसली नाही. त्यांनी म्हटलं, "मला काही माहित नाही, मला याबदद्ल काही बोलायचं नाही. मॅच दरम्यान माझं इ
तर बाबींकडे लक्ष होतं." तबरेज पुढं म्हणाला, हा वर्ल्डकप आहे, आम्ही असे छोटे कामं करत नाही. दरम्यान, फिफा याबद्दल आता चौकशी करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.