नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. या सगळ्या चर्चांवर गौतम गंभीरनं मौन सोडलं आहे. आमच्या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा किंवा वाद नाहीत पण देशासाठी खेळताना दोघांमध्ये मतभिन्नता आहे, असं गंभीर म्हणाला आहे.
मित्रांबरोबर किंवा कुटुंबामध्येही मतभेद आणि मतभिन्नता असते. मतभिन्नता असली तरी देशाला जिंकवणं हाच आमचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया गंभीरनं दिली आहे. टी 20 आणि 2011 वर्ल्ड कपमधला विजय तसंच टेस्टमध्ये भारताला एक नंबरवर पोहोचवणं, हे धोनीबरोबर घालवलेले खास क्षण मी कधीच विसरू शकत नाही, असं वक्तव्य गंभीरनं केलं आहे.