नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर फलंदाज क्रिस गेल क्रिकेटचे सर्वात छोटे प्रारूप असलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ८००० रन्स पूर्ण करणार जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
या डावखुऱ्या फलंदाजाने ही कामगिरी कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या टी-२० सामन्यात जमैकाकडून खेळताना पूर्ण केली आहे. किंग्स्टनमध्ये सेंट लुसिया जाऊक्स विरोधात खेळताना गेलने नाबाद ६५ रन्स केल्या.
विविध देशांच्या टी-२० सामन्यात खेळणाऱ्या क्रिस केल याने आतापर्यंत २१७ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात ८०३७ रन्स काढल्या आहेत. त्यात १५ शतक आणि ५२ अर्धशतक केले आहे. त्यात त्याने ४४.४० च्या सरासरीने आणि १४८.८६ स्ट्राइक रेटने हे रन्स काढले आहेत.
टी-२० सर्वाधिक रन्स बनविणाऱ्यांच्या यादीत ३५ वर्षीय गेलनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ब्रॅड हॉज याचा क्रमांक लागतो, त्याने ६४७१ रन्स केले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.