राजकोट : यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर क्रिस गेलला सूर गवसला आहे. गेलच्या या वादळाचा फटका गुजरात लायन्सला बसला आहे. गेलनं ३८ बॉल्समध्ये ७७ रन्सची खेळी केली. यामध्ये ७ सिक्स आणि ४ फोरचा समावेश होता. गेलच्या या वादळी खेळीमुळे आरसीबीनं गुजरात लायन्सचा २१ रन्सनं पराभव केला आहे.
याच मॅचमध्ये गेलनं टी-20 क्रिकेटमध्ये १० हजार रनचा विश्वविक्रम केला आहे. टी-20मध्ये १० हजार रन्स करणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. गेलनंतर या यादीमध्ये न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅकल्लमचा नंबर लागतो. टी-20मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये आठ नंबरवर विराट कोहली तर नऊ नंबरवर सुरेश रैना आहे.