हरभजनचा आयपीएलमधला हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडला

आयपीएलच्या इतिहासात हरभजनने रचलेला हा इतिहास अजून कोणताही दिग्गज मोडू शकला नाहीये. हा इतिहास आहे शून्यावर सर्वाधिकवेळा बाद होण्याचा.

Intern Intern | Updated: Apr 7, 2017, 06:50 PM IST
हरभजनचा आयपीएलमधला हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडला title=

मुंबई : आयपीएलच्या इतिहासात हरभजनने रचलेला हा इतिहास अजून कोणताही दिग्गज मोडू शकला नाहीये. हा इतिहास आहे शून्यावर सर्वाधिकवेळा बाद होण्याचा.

खातं खोलण्याआधीच ड्रेसिंग रुममध्ये परतणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हरभजनचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. आत्तापर्यंत तो जवळपास 12वेळा शून्यावर बाद झाला आहे.

हरभजनने आत्तापर्यंत 125 सामन्यांच्या 77 इनिंग्समधून 783 धावा बनवल्या आहेत. यात 30 सामन्यामध्ये तो नाबाद राहिला आहे. दरम्यान त्याने 76 चौकार आणि 40 षटकार लगावले आहेत.