नवी दिल्ली : 'फिरोजशाह कोटला मैदानावर जे काही घडलं त्यात माझी कोणतीही चूक नव्हती... सगळं काही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय' असं स्पष्टीकरण क्रिकेटर मनोज तिवारीनं गौतम गंभीरसोबत झालेल्या हाणामारीनंतर दिलंय.
फिरोजशाह कोटला मैदानावर आज दिल्ली विरुद्ध पश्चिम बंगाल असा रणजी सामन्यात दोन्ही टीम्सचे कर्णधार गौतम गंभीर आणि मनोज तिवारी एकमेकांच्या समोरसमोर आले... इतकंच नाही तर त्यांनी मैदानातच एकमेकांना हाणामारीही केली. त्यानंतर, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंच के. श्रीनाथ यांनाही गौतम गंभीरनं धक्काबुक्की केली. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होतोय.
अधिक वाचा - मैदानातच हाणामारी... गौतम गंभीर, मनोज तिवारी एकमेकांना भिडले
यावर प्रतिक्रिया देताना मनोज तिवारीनं 'अनेक गोष्टी आऊट ऑफ कंट्रोल गेल्या... एखादा जर आपल्या सीमारेषा ओलांडत असेल तर साहजिकच मलाही ते चांगलं वाटणार नाही... पण, गौतम गंभीर हा माझा सिनिअर खेळाडू आहे... म्हणून मी त्याचा आदर करतो' असं मनोज तिवारीनं म्हटलंय.
तर, काहीच घडलं नसल्याची प्रतिक्रिया गौतम गंभीरनं दिलीय.
Gautam Gambhir on heated conversation with Manoj Tiwary during the match. pic.twitter.com/30bnbl5PrU
— ANI (@ANI_news) October 24, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.