लंडन : आयसीसीने इंग्लडचा क्रिकेटर मोईन अलीवर ‘सेव्ह गाझा’ रिस्ट बँड घालण्यावर बंदी घातली आहे. मोईन भारताविरुद्ध साऊथहॅम्पटनमध्ये तिसरी कसोटी खेळण्यासाठी उतरला तेव्हा दुसऱ्या दिवशी ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्रि पॅलेस्टाइन’ चा रिस्ट बँड घातला होता.
आयसीसीने मंगळवारी जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले की, आयसीसीचे कोणतेही उपकरण किंवा कपड्यांसंदर्भातील नियमानुसार कोणत्याही इंटरनॅशनल मॅच दरम्यान कोणताही राजकीय, धार्मिक किंवा जातीय कार्याशी निगडीत संदेशाच्या प्रचार करण्याची परवानगी देण्यात येत नाही.
मोईन अलीने बँड घातल्यामुळे त्याच्यावर बंदीही घालण्यात आली असती. पण आयसीसीने अशी बंदी घातली नाही. आयसीसीच्या नियमानुसार कोणताही खेळाडून टीम अधिकाऱ्याच्या किंवा क्रिकेट बोर्डाच्या परवानगी शिवाय संदेश देणारा बँड, कपडे आणि इतर कोणत्याही गोष्टीचा वापर करू शकत नाही. मैदानावर कोणत्याही खेळाडूला राजकीय, धर्मिक आणि वंशासंबंधी संदेशाच्या प्रचाराची परवानगी देत नाही. मोईनने अशा प्रकारचा रिस्ट बँड घालण्यापूर्वी टीम प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती किंवा त्यांना याची माहिती दिली नव्हती.
दरम्यान, इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने मोईन अलीचे समर्थन केले आहे. मोईनने कोणत्याही राजकीय हेतुने बँड घातला नव्हता. बोर्डाने सांगितले की, मानवतेच्या दृष्टीने त्याने हा बँड घातला होता. मंगळवारी इंग्लड टीमचे खेळाडू स्वतः पहिल्या महायुद्धाच्या १०० वर्षपूर्तीनिमित्त शहिदांना मानवंदना देण्यासाठी शर्टवर लोगो लावून मैदानात उतरले होते.
मूळचा पाकिस्तानी असलेला मोईन अलीने यापूर्वीही गाझा आणि पॅलेस्टाइनच्या लोकांच्या समर्थनासाठी झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. गेल्या आठवड्यात अली आपले होम टाऊन असलेल्या बर्मिंगम येथे गाझा येथील लोकांसाठी मदत निधीच्या कार्यक्रमात सामील झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.