पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका?

पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

Updated: Mar 19, 2015, 03:34 PM IST
पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका? title=

कराची: पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

खान म्हणाले, अजमल दुखापतग्रस्त फास्ट बॉलर मोहम्मद इरफानची जागा घेऊ शकतो. पाकिस्तानला क्वॉर्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी लढायचं आहे. 

खान पुढे म्हणाले, 'आम्ही इरफानचा विकल्प पाठवत नाहीय, कारण यासाठी आता वेळ नाही उरला. तो क्वॉर्टर फायनलपर्यंत पोहोचू शकणार नाही. मात्र पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचेल तर तेव्हा पर्यायी खेळाडू पाठवता येईल आणि तो सईद अजमल असू शकतो.'

अजमल वर्ल्डकपसाठी टिव्ही चॅनेलवर विशेषज्ञाच्या भूमिकेत आहे. त्यानं पेट्रन ट्रॉफी टूर्नामेंचमध्ये पहिली गैर प्रथम श्रेणी ग्रेड २ मॅच खेळायची होती. पण निवड समितीने परवानगी दिली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.