भारत-ऑस्ट्रेलिया मॅच : 'स्लेजिंग' तर होणारच...

गुरुवारी वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना धडकणार आहे... मैदानात ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू आहेत आणि स्लेजिंग होणार नाही, ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.... आणि हाच इशारा मायकल क्लार्कनंही दिलाय. 

Updated: Mar 25, 2015, 08:41 PM IST
भारत-ऑस्ट्रेलिया मॅच : 'स्लेजिंग' तर होणारच... title=

सिडनी : गुरुवारी वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना धडकणार आहे... मैदानात ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू आहेत आणि स्लेजिंग होणार नाही, ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.... आणि हाच इशारा मायकल क्लार्कनंही दिलाय. 

मैदानावर प्रतिस्पर्धी टीमवर शाब्दीक हल्ले चढवणारच... शेवटी तोही एक खेळाचाच भाग आहे... याबाबतील आमच्याबाबत कोण काय बोलतं याचा आम्ही विचार करणार नाही, असं क्लार्कनं म्हटलंय. 

तर टीम इंडियानं मात्र एका मर्यादेपर्यंत 'स्लेजिंग' योग्य असल्याचं म्हटलंय. पण, सोबतच ऑस्ट्रेलियाबरोबर टीम इंडिया आधीच्या पराभवाचा हिशोब चुकता करेल, असा इशाराही भारताचा आक्रमक बॅटसमन विराट कोहलीनं दिलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.