कोलकाता : नुकताच आशिया कप जिंकलेला भारतीय संघाचा आज वेस्ट इंडिजशी पहिला सराव सामना होतोय.
भारताने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला हरवल्यानंतर सहाव्यांदा अशिया कपवर नाव कोरले. या सराव सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर साऱ्यांच्या नजरा असतील.
मात्र सध्या टीम इंडियाच्या अंतिम ११ मध्ये स्थान मिळवणे शामीसाठी कठीण वाटते. गेल्या वर्षी गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शामी पुनरागमनाचे प्रयत्न करतोय. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी शामीला पुन्हा दुखापत झाली.
वेस्ट इंडिजविरुद्ध आज पहिला सराव सामना त्यानंतर १२ मार्चला मुंबईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा सराव सामना होईल. या सामन्यादरम्यान शमीची फिटनेस चाचणी होईल.