स्पॉट फिक्सिंग : पुराव्याअभावी श्रीसंत, चंडिला, चव्हाणसह सर्व आरोपमुक्त

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या तिघा खेडाळूंसह सर्व 36 आरोपींची पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता झालीय. 

Updated: Jul 25, 2015, 08:23 PM IST
स्पॉट फिक्सिंग : पुराव्याअभावी श्रीसंत, चंडिला, चव्हाणसह सर्व आरोपमुक्त title=

नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला या तिघा खेडाळूंसह सर्व 36 आरोपींची पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता झालीय. 

दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. या खटल्यात 16 जण अटकेत तर तीन खेळाडूंसह 20 जण जामीनावर होते.

सकाळी झालेल्या सुनावणीत मुद्गल आणि लोढा समितीच्या अहवालाच्या आधारे नव्यानं आरोपपत्र दाखल करण्याची विनंती दिल्ली पोलिसांनी कोर्टाला केली होती. पोलिसांनी आधी दाखल केलेल्या 6000 पानी आरोपपत्रात एकूण 42 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकीलसह दाऊदचे अन्य 4 साथीदार फरार घोषित करण्यात आलं होतं.

दरम्यान, या निकालानंतर श्रीशांत, चव्हाण, चंडिला यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. घरच्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केलाय. कोचीमध्ये श्रीशांतच्या पालकांनी या हा निकाल येताच एकच जल्लोष केला. त्याच्या आई-वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. मुंबईत अंकितच्या घराबाहेरही चाहत्यांनी त्याच्या पालकांसोबत आनंद साजरा केला. या तीन्ही खेळाडूंनी अखेर आपल्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.