'फिक्सिंग' बाबत ट्विटरवर फुटला मोदी बॉम्ब; धोनीच्या अडचणी वाढणार?

'आयपीएल सीझन ६' मधील स्पॉट फिक्सिंग प्रकणात चेन्नई सुपरकिंग्सच्या चार खेळाडूंचाही समावेश होता, असं म्हणणं आहे ललित मोंदीचं... 

Updated: May 14, 2015, 04:12 PM IST
'फिक्सिंग' बाबत ट्विटरवर फुटला मोदी बॉम्ब; धोनीच्या अडचणी वाढणार? title=

नवी दिल्ली : 'आयपीएल सीझन ६' मधील स्पॉट फिक्सिंग प्रकणात चेन्नई सुपरकिंग्सच्या चार खेळाडूंचाही समावेश होता, असं म्हणणं आहे ललित मोंदीचं... 

सध्या लंडनमध्ये राहत असलेले आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदींनी केलेल्या या दाव्यानुसार, बीसीसीआयने कारवाई केली तर येणाऱ्या काळात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या अडचणी वाढू शकतात. 

'जर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी खेळाडूंचा खुलासा केला तर त्यात चार खेळाड़ू चेन्नईचे निघतील. या खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश आहे' असं ललित मोदींनी सोशल वेबसाईट ट्विटरवर म्हटलंय. यावेळी, मोदींनी चेन्नईच्या मालकांना 'मास्टरमाईंड' संबोधलंय. तसंच या फिक्सिंगमध्ये चेन्नईच्या बोर्ड सदस्यांसह टीमच्या मालकांचाही समावेश असल्याचा आरोप ललित मोदींनी केलाय. 

या प्रकरणी तपास करणाऱ्या मुद्गल समितीने सर्वोच्च न्यायालयाला १३ खेळाडूंची नावे दिली होती. त्यातील चार नावांचा खुलासा झाला होता, मात्र उरलेल्या नऊ नावं कोणाची आहेत याचा खुलासा अजून झालेला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.