नवख्या लोकेश राहुलनं तोडला २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा उमदा खेळाडू लोकेश राहुल क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत भरलाय. गुरुवारी, आपल्या करिअरच्या दुसऱ्या मॅचमध्येच शतक ठोकणाऱ्या लोकेशनं २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. 

Updated: Jan 9, 2015, 10:19 AM IST
नवख्या लोकेश राहुलनं तोडला २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा उमदा खेळाडू लोकेश राहुल क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत भरलाय. गुरुवारी, आपल्या करिअरच्या दुसऱ्या मॅचमध्येच शतक ठोकणाऱ्या लोकेशनं २३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढलाय. 

मेलबर्न टेस्ट फ्लॉप झाल्यानंतर टीकेचा धनी झालेल्या लोकेशनं आपल्या तिसऱ्या डावात दमदार अशी खेळी खेळलीय. ११० रनांच्या या भागात लोकेशनं २६२ बॉल्सचा सामना करत १३ फोर आणि एक सिक्स ठोकला.  

आपल्या या धम्माल खेळीमुळे सोशल वेबसाईट 'ट्विटर'वर 'केएलराहुल' हा हॅशटॅग सध्या सर्वाधिक ट्रेन्डमध्ये दिसतोय. 

राहुल पूर्वी हा रेकॉर्ड रवि शास्त्री यांनी केला होता. आत्तापर्यंत, रवी शास्त्री अंतिम भारतीय बॅटसमन होते ज्यांनी २५० बॉल्सचा सामना केला होता. रवी शास्त्री यांनी हा रेकॉर्ड १९९२ साली कायम केला होता. महत्त्वाचं म्हणजे, सध्या हेच रवी शास्त्री टीम इंडियाचे संचालक आहेत... आणि ज्यावेळी त्यांनी हा रेकॉ़र्ड कायम केला होता तेव्हा लोकेशचा जन्मही झाला नव्हता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.