रांची: भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हणजे भारताचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचं होम ग्राऊंड.
आपल्या होम ग्राऊंडवर होणारी ही मॅच जिंकून सीरिजमध्ये 1-0नं पिछाडीवर पडलेल्या भारताला जिंकवण्याचा प्रयत्न धोनी नक्कीच करेल. पण आपल्या घरच्या मैदानावर धोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतली ही शेवटची मॅच असू शकते, असं बोललं जात आहे.
वर्ल्ड टी-20 मध्येही रांचीच्या मैदानामध्ये एकही मॅच होणार नाही, त्यामुळे शुक्रवारी होणारी ही मॅच घरच्या मैदानातली धोनीची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.