ढाका : वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीचा बांगलादेशातील एका खेळाडूला फायदा होतांना दिसतोय. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसेनवर बलात्काराचे आरोप होते.
रूबेल हुसेनची कामगिरी पाहून त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्याचा निर्णय नाझनीन अख्तरने घेतला आहे.
नाझनीने केलेल्या आरोपांमुळे रूबेल हुसेनची वर्ल्डकप मोहिम संकटात होती. बलात्काराच्या आरोपावरून त्याला तुरूंगात टाकण्यात आलं होतं.. मात्र बांगलादेश संघातील महत्वाचा खेळाडू असल्याने त्याला जामीन मिळाला, त्यामुळे त्याला वर्ल्डकपमध्ये खेळता आलं.
मी रूबेलला माफ केले आहे, न्यायालयातील आरोपही मागे घेतले आहेत, असे नाझनीनं हिने बांगलादेशातील एका न्यूज चॅनेलशी बोलतांना म्हटलं आहे.
रूबेलने भेदक गोलंदाजी केली, यात बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. आता यापुढील सामन्यात त्यावर कोणतंही दडपण नको, याचा विचार करून नाझनीनने आरोप मागे घेतल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलंय.
रूबेलने अंतिम क्षणी महत्वाच्या दोन विकेट घेऊन, बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं, यानंतर नाझनीनने बलात्काराचे आरोप मागे घेतले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.