www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोलकता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) शाहरुखवर ही बंदी घातली आहे. पण आता मात्र आयपीएलचे कमिश्नर रणजीब बिस्वाल यांनी शाहरूख खानवरील ही बंदी हटवावी अशी मागणी केली आहे.
शाहरूखने 2012 मध्ये `आयपीएल`चा सामना झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांशी वाद घातला होता.
या कारणाने शाहरूखला वानखेडेवर येण्यासाठी 5 वर्षाची बंदी घालण्यात आली होती.
शाहरूखवरील या बंदीच्या कारणाने आयपीएल 7 चा अंतिम सामना हा वानखेडेवर न खेळविण्याची तयारी ही दर्शविण्यात आली. या कारणाने अंतिम सामना बंगळुरमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर हलविण्यात आला आहे.
खरं म्हणजे वानखेडेवर शाहरूखला असल्यानेच अंतिम सामना हा वानखेडेवर न खेळविण्याचा आयपीएल कमिटीने निर्णय घेतल्याचा अंदाज जाणकरांकडून वर्तवण्यात येत आहे. या मुळेच बिस्वाल यांनी एमसीएने शाहरुखवरील बंदी हटवावी, अशी मागणी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.