अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : डिजिटल गेमिंगमध्ये सध्या पोकेमॉननं साऱ्या जगाला वेड लावलंय. मात्र आता लवकरच एक अस्सल भारतीय रिअल हिरो तुमच्या भेटीला येणार आहे.
पुण्यातील जेटसिंथेसिस कंपनीनं विकसित केलेल्या सचिन सागा या अनोख्या गेम मध्ये चक्क मास्टर ब्लास्टर सचिनचा सहभाग असणार आहे.
क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरही आता डिजिटल गेम रुपात अवतरलाय.. या गेममध्ये साक्षात सचिन तेंडुलकर तुमचा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणार आहे. या गेममधे तुम्ही सचिन बनून तुमचा संघ निवडू शकणार आहात..
इतकंच नाही तर तुमच्या मित्रांबरोबर खेळून वर्ल्ड कपही जिंकू शकणार आहात. मनोरंजनाबरोबरच उच्च दर्जाच्या क्रिकेटचं प्रशिक्षण एका रिअल हिरोच्या माध्यमातून तुम्हाला या गेमद्वारे मिळणार आहे. पुण्यातील जेटसिंथेसिस कंपनीनं विकसित केलेल्या सचिन सागा या अनोख्या गेममध्ये हा अनुभव तुम्हाला मिळणार आहे..
सचिन सागा हा गेम अँड्रॉइड, आयओएस, विंडोज, स्मार्टफोन्सवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कॉन्सोलवरदेखील तो सादर केला जाणार आहे.
सचिन सागा या गेममधे सचिन आणि गेम खेळणारी व्यक्ती यांच्यामध्ये एक आभासी बंध निर्माण करण्यात येतो. या गेमबद्दल स्वतः सचिनही कमालीचा उत्सुक आहे. डिजिटल गेमिंगचा सध्या झपाट्यानं विकास आणि विस्तार होतोय.. त्यामुळं पोकोमॅन गेमपाठोपाठ जगाला सचिन सागानं वेड लावल्यास आश्चर्य वाटायला नको...