टीम इंडियामध्ये लवकरच नोकरीची संधी

तुम्ही बरोबर ऐकलंय... टीम इंडियामध्ये निघालीय VCACANCY.. तुम्ही क्रिकेट खेळलं असेल... तुम्हाला क्रिकेट समजत असेल... तुम्ही क्रिकेटचे EXPERT असाल... तुमच्या नसानसात क्रिकेट असेल.... तर ही बातमी केवळ तुमच्यासाठीच आहे.

Updated: Apr 6, 2015, 06:52 PM IST
टीम इंडियामध्ये लवकरच नोकरीची संधी  title=

मुंबई : तुम्ही बरोबर ऐकलंय... टीम इंडियामध्ये निघालीय VCACANCY.. तुम्ही क्रिकेट खेळलं असेल... तुम्हाला क्रिकेट समजत असेल... तुम्ही क्रिकेटचे EXPERT असाल... तुमच्या नसानसात क्रिकेट असेल.... तर ही बातमी केवळ तुमच्यासाठीच आहे.

कारण टीम इंडियामध्ये अशी वेकन्सी निघाली आहे.... ज्यामध्ये तुम्हाला टीम इंडियाबरोबर राहण्याची संधी मिळेल.. टीम इंडियाबरोबर दौ-यावर जाण्याची आणि लाखो रुपये कमवण्याचीही तुम्हाला संधी मिळेल.. तुम्हाला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि वाईस कॅप्टन विराट कोहलीशी क्रिकेटच्या बारकाव्यांवर चर्चाही करायला मिळेल.... तर वेळेतच टीम इंडियात निघालेल्या वेकन्सीसाठी लवकरातलवकर अप्लाय करा.... नाहीतर एखादा परदेशी तुमची ही संधी हिरावून घेईल... लक्षात ठेवा ही संधी केवळ मर्यादित काळासाठी आहे...

टीम इंडियामध्ये लवकरच एक वेकन्सी निघणार आहे... ही नोकरी आणि भारतीय टीमच्या कोचची... कारण कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपलाय.. त्यांना एक्सटेन्शन मिळण्याची शक्यताही कमीच आहे. 

टीम इंडियामध्ये लवकरच एका नोकरीसाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत.. बीसीसीआय आपल्या पारदर्शतेसाठी कधीच ओळखली जात नाही.  एखाद्याला अचानक नोकरी कशी लागली हे कळतच नाही. मात्र, या नोकरीसाठी अर्ज देण्याची वेळ सुरू झाली आहे असचं समजा.

टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ वर्ल्ड कपर्यंतच होता. जो 31 मार्चला संपुष्टात आलाय. फ्लेचर यांनी 2011 वर्ल्ड कपनंतर 2 वर्षांसाठी टीम इंडियाच्या कोचची धुरा सांभाळली.. 
2013 मध्ये त्यांना एक वर्षांचं एक्सटेंशन देण्यात आलं. 2014 मध्ये वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन त्यांचं कॉन्ट्रॅक्ट एक वर्षांसाठी आणखी वाढवण्यात आलं. 

आता डंकन फ्लेचर यांची जागा घेण्यासाठी जाहिराती निघण्याच्या तयारी सुरू आहे.  असं पाहिलं गेलं तर डंकन फ्लेचर विचार करत असतील की केवळ येस मॅन अर्थातच हो ला हो करण्यासाठी लाखो रुपये मिळत असतील तर काय वाईट आहे. 

कोच म्हणून फ्लेचर यांना एक्सटेंशन मिळेल अशी कुठलीही परिस्थिती सध्यातरी दिसत नाही. 

परदेशी भूमीवर टीम इंडियाला विजयश्री मिळवून देण्यात फ्लेचर सपशेल अपयशी ठरले होते. आता हे पाहण महत्त्वाच ठरले की यावेळी बीसीसीआय जेव्हा भारताच्या कोचसाठी बायाडेटा मागवेल त्यामध्ये फक्त परदेशी प्रशिक्षकांना संधी मिळते की एखाद्या भारतीयाला.... गेल्या 15 वर्षांपासून  भारतीय क्रिकेटमध्ये परदेशीचा कोचचा बोलबाला आहे.. मात्र, आता फ्लेचर यांच्या विदाईची वेळ आली आहे... त्यांना थांबवण्यात येईल असं कुठलही काम त्यांनी केलेलं नाही. आणि रिप्लेसमेंटसाठी यावेळी परदेशी नाही तर देशी कोच तयार आहे...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.