दुबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा खिताब पटकावणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीये. कोहली या क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचलाय.
विशाखापट्टणम येथील टेस्टमध्ये कोहलीने 167 आणि 81 धावा केल्या. त्यामुळे 800 गुणांसह तो चौथ्या स्थानावर गेलाय. मात्र अद्यापही तो इंग्लंडच्या ज्यो रुटपासून 22 गुणांनी पिछाडीवर आहे. ज्यो रुट दुसऱ्या स्थानी आहे.
मोहाली टेस्टमध्ये चांगली कामगिरी करुन क्रमवारी सुधारण्याची संधी विराटकडे आहे. या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा नवव्या स्थानी आहे.
वनडे आणि टी-20 क्रमवारीत विराट अनुक्रमे दुसऱ्या आणि पहिल्या स्थानी आहे.