मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने वेगवान ७ हजार धावांचा तसेच २४ शतकांचा टप्पा गाठला. कोहलीने ४३व्या ओव्हरमध्ये रिचर्डसन यांच्या चेंडूवर धाव घेत २४वे शतक साजरे केले. हे त्याचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे चौथे शतक आहे. कोहलीने १६९व्या सामन्यात १६१व्या डावात २४वेे शतक केले. यात त्याने विक्रमवीर सचिनलाही माग
गेल्या सामन्यात अवघ्या १९ धावांनी त्याचा विक्रम हुकला होता. मात्र या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सचा रेकॉर्ड मोडलाय.
विराटने वनडेमध्ये वेगवान ७ हजार धावा केल्यात. १६१ व्या डावात त्याने हा विक्रम केलाय. यापूर्वी एबी डेविलियर्सने १६६ व्या डावात सात हजार वेगवान धावा करण्याचा विक्रम केला होता. त्याचा हा विक्रम कोहलीने मोडीत काढला.
विराटने वनडे कारकिर्दीत ५१च्या सरासरीने २४ शतके आणि ३६ अर्धशतकांसह सात हजाराहून अधिक धावा केल्यात.