विराट कोहलीला नागिणीचा झटका

जशी बॉलीवूडमध्ये सिनेमांच्या हिट आणि फ्लॉपची चर्चा सुरु असते त्याचप्रमाणे चर्चित मालिकांचेही रेटिंग असते. सध्या स्पर्धा सुरु आहे भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि कर्णधार विराट कोहली आणि नागिन यांच्यात.

Updated: Jan 30, 2017, 02:22 PM IST
विराट कोहलीला नागिणीचा झटका title=

मुंबई : जशी बॉलीवूडमध्ये सिनेमांच्या हिट आणि फ्लॉपची चर्चा सुरु असते त्याचप्रमाणे चर्चित मालिकांचेही रेटिंग असते. सध्या स्पर्धा सुरु आहे भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि कर्णधार विराट कोहली आणि नागिन यांच्यात.

जेव्हा क्रिकेटची मॅच असते त्यावेळी इतर कार्यक्रम आणि चॅनेल एकीकडे असतात तर दुसरीकडे दूरदर्शन आणि स्टार स्पोर्ट्स यासारख्या चॅनेल पाहणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र नागिन मालिकेच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळतोय की त्यांनी क्रिकेटलाही मागे टाकलेय. 

मनोरंज कार्यक्रमांच्या रेटिंग यादीत अव्वल स्थान मिळवलेय ते नागिन २ या मालिकेने. त्यानंतर भारत वि इंग्लंड मॅच, कुमकुम भाग्य आणि शक्ती : अस्तित्व का एहसास यांचा नंबर लागतो.