'आपण संरक्षणकर्ते आहोत, नष्टकर्ते नाहीत'

सेहवागने टि्वटरवरुन आवाहन केले आहे.

Updated: Feb 21, 2016, 07:54 PM IST
'आपण संरक्षणकर्ते आहोत, नष्टकर्ते नाहीत' title=

नवी दिल्ली : जाट समाजातील लोक संरक्षणकर्ते आहेत, नष्ट करणारे नाहीत. त्यामुळे मी माझ्या सर्व बंधुंना हिंसा थांबवण्याचे आवाहन करतो, असे आवाहन क्रिेकेटर विरेंद्र सेहवागने जाट आंदोलकांना केले आहे. आरक्षणासाठी सुरु असलेले हिंसक आंदोलन संपवण्याचे आवाहन विराटने केले आहे.
 
जाट समाजाने आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने मांडाव्यात. आपण संरक्षणकर्ते आहोत, नष्टकर्ते नाहीत, असे सेहवागने टि्वटरवरुन आवाहन केले आहे. 

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाचे हिंसक आंदोलन सुरु आहे. अनेक जाट नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मोठया प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मात्र तरीही हरयाणाच्या अनेक भागांमध्ये हिंसक आंदोलन सुरु आहे. 

सेहवाग स्वत: जाट आहे. आपण लष्करात, खेळांमध्ये अनेकदा देशाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली आहे. आपल्यामध्ये जो उत्साह, आवेश आहे, त्याचा आपण देशाच्या भल्यासाठी विचार करु असे सेहवागने सांगितले.