बीड: मराठवाड्यातल्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मराठवाड्याच्या या दुष्काळाची दखल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनंही घेतली आहे.
सचिन तेंडुलकरचे स्वीय सहायक नारायण कन्हान यांनी बीडमधल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. मराठवाड्यातील दुष्काळाची त्यांनी माहिती घेतली आणि काय मदत करता येईल याची चाचपणी केली.
वैयक्तिक मदतीपेक्षा सिंचनाच्या सोयी, वीज, रस्ते पाणी या सुविधा देण्याचा विचार आहे, पण यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नको, आम्हाला स्वतंत्रपणे काम करायला आवडेल अशी प्रतिक्रिया सचिनच्या स्वीय सहायकांनी दिली आहे.