... जेव्हा विराट कोहलीनं रैनाची कॅच सोडली

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान धर्मशाळा इथं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये एक अजबच दृश्य पाहायला मिळाल. टीम इंडियाच्या इनिंगच्या वेळी सुरेश रैनानं १७व्या ओव्हर्समध्ये केगिंसो रबाडाच्या बॉलवर एक पूल शॉट मारला. बॉल रैनाच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून फाइन लेग बाउंड्रीकडे गेले. तिथंच टीम इंडियाचं डगआउट होतं आणि तिथेच विराट कोहली कॅच पकडायला पुढे आला पण कोहलीची कॅच पकडू शकला नाही.

Updated: Oct 4, 2015, 09:17 AM IST
... जेव्हा विराट कोहलीनं रैनाची कॅच सोडली title=

धर्मशाळा: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान धर्मशाळा इथं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये एक अजबच दृश्य पाहायला मिळाल. टीम इंडियाच्या इनिंगच्या वेळी सुरेश रैनानं १७व्या ओव्हर्समध्ये केगिंसो रबाडाच्या बॉलवर एक पूल शॉट मारला. बॉल रैनाच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून फाइन लेग बाउंड्रीकडे गेले. तिथंच टीम इंडियाचं डगआउट होतं आणि तिथेच विराट कोहली कॅच पकडायला पुढे आला पण कोहलीची कॅच पकडू शकला नाही.

आणखी वाचा - स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ विकेटने विजय

रैनाची ही कॅच पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विराट कोहलीचा हा व्हिडिओ बीसीसीआयनं ट्विटरवर पोस्ट केलाय. बीसीसीआयनं लिहिंल, 'जेव्हा विराट कोहलीनं सुरेश रैनाची कॅच सोडली.'

सुरुवातीला रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टीम इंडियाची चांगली सुरूवात केली आणि पाच विकेट वर १९९ रन्स बनवले. दक्षिण आफ्रिकेसमोर २०० रन्सचं टार्गेट ठेवलं. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्स आणि जेपी ड्युमिनीच्या तुफानी बॅटिंगमुळे भारतानं ही मॅच सात विकेट्सनी गमावली. 

आणखी वाचा - अपशब्द वापरणं म्हणजे आक्रमकता नव्हे, धोनीनं सुनावलं!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.