वर्ल्डकप २०१५ : मोहित ठरणार टीम इंडियाचा 'पाॅवर प्ले' भिडू...

ईशांत शर्मा वर्ल्ड कपमधून आऊट झाल्यानं मोहित शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलंय. दुखापतग्रस्त ईशांतमुळे मोहितचं नशिब फळफळलंय. त्यामुळे मोहित या संधीचं सोन करण्यात यशस्वी ठरतो का? ते पाहण महत्वाचं ठरणार आहे. 

Updated: Feb 11, 2015, 01:00 PM IST
वर्ल्डकप २०१५ : मोहित ठरणार टीम इंडियाचा 'पाॅवर प्ले' भिडू... title=

मुंबई : ईशांत शर्मा वर्ल्ड कपमधून आऊट झाल्यानं मोहित शर्माला टीममध्ये स्थान देण्यात आलंय. दुखापतग्रस्त ईशांतमुळे मोहितचं नशिब फळफळलंय. त्यामुळे मोहित या संधीचं सोन करण्यात यशस्वी ठरतो का? ते पाहण महत्वाचं ठरणार आहे. 

मोहित शर्मा...  या नावाची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात चांगलीच सुरु आहे. ईशांत शर्मा दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकणार असल्यानं त्याची टीम इंडियामध्ये वर्णी लागली आहे. आता वर्ल्ड कपमध्ये भारताच्या बॉलर्समध्ये त्याचाही समावेश झालाय. अवघ्या १२ वन-डे मॅचेसचा अनुभव गाठीशी घेऊन तो क्रिकेट जगतातील सर्वाती मोठी टुर्नामेंट असलेल्या वर्ल्ड कपमध्ये आपलं नशिब आजमावणार आहे. लकीली टीम इंडियात एन्ट्री मिळवलेला हा बॉलर भारतीय टीमचंही नशिब बदलतो का याकडेच साऱ्यांचच लक्ष असणार आहे. त्याच्या टीम इंडियातील निवडीमुळे अनेकांनी भुवया उंचावल्या. मोहम्मद शमी, भुवनेशव्वर कुमार आणि उमेश यादवसह आता तो भारतीय टीमच्या बॉलिंगची धुरा सांभाळणार आहे.

मोहित शर्मानं १२ वन-डे मॅचेसमध्ये ४.९८च्या इकॉनॉमीनं १० विकेट्स घेतल्या आहेत. २२ रन्स देत ४ विकेट्स ही त्याची वन-डेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.  

आयपीएलमुळे लाईम लाईटमध्ये आलेल्या या क्रिकेटरनं भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक वन-डे मॅच खेळली. ट्राय  सीरिजमधील एका मॅचमध्ये त्यानं बॅट्समनना रोखण्याच काम केलं. मात्र, भारताला त्याला विजय मिळवून देता आला नव्हता. पाॅवर प्लेमध्ये रन्स रोखून धरणारा एक बॉलर धोनीला हवाय. धोनीच्या या प्रश्नाचं कदाचित 'मोहित' उत्तर असू शकेल. बॅट्समनना कायमच विचार करावा लावणारा तो बॉलर आहे. त्याच प्रमाणे अचूक मारा हा त्याचा प्लस पॉईंट आहे. मात्र, त्याच्या गाठिशी फारसा अनुभव नाही. आता आधीच लंगडी पडलेल्या टीम इंडियाच्या बॉलिंगला मोहितच्या येण्यानं काही फरक पडले का? ते वर्ल्ड कप सुरु झाल्यावरच कळेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.