चंदीगड : अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला फब्रेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्याचे वडील म्हणालेत, तो काही बर्फ नाही, की लगेच विरघळून जाईल. त्याची मानसिकता कणखर आहे.
योगराज सिंग हे माजी क्रिकेट खेळाडू आहेत. ते युवराजचे वडील होत. युवराजवर कोणताही वर्तमानातील घटनाक्रमचा फरक पडणार नाही. त्याचा आत्मविश्वास चांगला आहे. तो भारतीय संघात लवकरच आपले स्थान पक्के करील. कितीही मोठा कठिण काळ येऊ दे, त्याचा आत्मविश्वास मोठा आहे. माझ्या मुलाचे मन नेहमी मोठे होते. मी त्याचे संगोपन केले आहे. त्यामुळे माझा मुलगा कसा आहे, हे मला माहित आहे. तो काही बर्षाचा गोळा नाही. लगेच वितळून जायला.
कितीही मोठे वादळ येऊ दे. तो त्याचा चांगला सामना करु शकेल. युवराजने मला संदेश पाठवला आहे. पपा तुम्ही काहीही चिंता करु नका. मी चंदीगडला येत आहे आणि येथे अभ्यास करणार आहे.
माझ्याप्रमाणे युवराजचे करिअर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाला वाटत नाही की तो (योगराज) पुढे जावे म्हणून. ही इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. मात्र, आम्हीला परमेश्वराच्या दरबारात न्याय मिळेल, असे योगराज म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.