बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 17, 2013, 05:58 PM IST

www.24taas.com, मुंबई
21 फेब्रुवारी ते 27 मार्च या काळात बारावीची परीक्षा होणार आहे. बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
बायोलॉजीचा म्हणजेच जीवशास्त्राचा पेपर 4 मार्च रोजी होणार होता. हा पेपर आता 17 मार्चला होणार आहे. तसंच केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राचा पेपर आधी 27 फेब्रुवारी रोजी होणार होता. तो आता 26 मार्चला होणार आहे.
केवळ विज्ञान शाखेच्या परीक्षेच्या वेळापत्रकातच बदल करण्यात आला आहे. कला आणि वाणिज्य शाखेच्या वेळापत्रकात मात्र कोणताही बदल झालेला नाही.