www.24taas.com, सिडने
जगभरातल्या तमाम पुरुषांनो... सावधान व्हा.. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी दावा केला आहे, की जगभरात पुरुष प्रजाती आता नष्ट होऊ लागली आहे. येत्या ५० लाख वर्षांत जगातून पुरुष प्रजाती नामशेष होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. क्रोमोसोम्सच्या आधारावर संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.
महिलांचे क्रोमोसोम्स पुरुषांपेक्षा अधित शक्तिशाली आणि मजबूत असल्याचं आढळून येऊ लागलें आहे. महिला पुरूषांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतात हे देखील सिद्ध होऊ लागलं आहे. मानव वंशामध्ये पुरुषांच्या जन्माचं प्रमाण मूलतः ककमी आहे. भारतामध्ये स्त्री भ्रूणहत्येसारख्या निंदनीय घटनांमुळे भारतात पुरुषांची संख्या जास्त आहे. मात्र जगभरात स्त्रियांचा जन्मदर वढत असून पुरुषांचा मृत्यूदर वाढत आहे.
पुरुष जातीची समाप्ती पुररुषांच्याच Y क्रोमोसोममुळे झाली आहे. ऑस्ट्रेलियातील प्रोफेसर जेनी ग्रेव्ह्स या नामांकित संशोधकाने हा निष्कर्ष काढला आहे. पृथ्वीतलावर शिलक राहाण्याच्या स्पर्धेत स्त्रियाच विजयी होणार आहेत. यापुढे प्रजनानाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र असेच घडणार असल्याच्या गोष्टीला पुष्टी मिळत आहे. अनेक स्त्री-पुरुषांच्या क्रोमोसोम्सचा अभ्यास केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.