www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
सोशल मीडिया हे यामागचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे. पाच वर्षांपूर्वी २००९मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूका झाल्या तेव्हा शशी थरूर हे एकमेव असे नेते होते. ज्यांचं ट्विटर अकाऊंट होतं. त्यांचे ६००० जण फॉलोअर होते. मात्र आता ज्यांचं ट्विटर अकाऊंट नाही, असे नेते फारच कमी असतील. पाच वर्षांमध्ये सोशल मीडियानं सामान्य नागरिकांसोबत राजकारण्यांवरही जो प्रभाव टाकलाय तो कमालीचा आहे.
निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा यंदा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय. फेसबुक, गुगल आणि ट्विटरद्वारे प्रचार, माहिती, कार्यकर्तेही बनवले जात आहेत. इथं चर्चा रंगतात, भांडणं होतात आणि मतं ही मांडली जातात. त्यामुळं प्रत्येक पक्षानं सोशल मीडियावर भरमसाठ खर्च केलाय.
फेसबुक, ट्विटर, गुगल या अमेरिकेच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांनीही भारताच्या लोकसभा निवडणुकी अगोदर तीन-चार महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. त्यांच्या हिट्समध्ये भरमसाठ वाढ झालीय. निवडणुकीत या कंपन्यांनी खूप पैसा कमावलाय. तर १६ मेला आतापर्यंतच्या सर्वात जास्त हिट्स त्यांना मिळतील अशी आशा आहे.
आपल्या देशातील नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचे ट्विटरवर बराक ओबामानंतर सर्वात जास्त ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसऱ्या नंबरवर इंडियन ट्विटर बॉय शशी थरूर आहेत. फेसबुकवरही मोदींनी अनेक पेजेस आहेत. त्या प्रत्येक पेजच्या लाईक्सच्या संख्येत दररोज हजारोंनी वाढ होतेय.
अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्याप्रमाणे संकटात आलीय. त्याला भारतील निवडणुकांमुळे आणि नवीन सरकारमुळं चांगलाच फायदा होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.