www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माझ्या फोनला हात नको लावू....
अरे मी फक्त पाहतो आहे...
नको म्हटलं ना....
नको दाखवू तुझा फोन... काही सोन्याचा नाही तो...
अरे, तो सोन्याचाच आहे.... हे संभाषण दोन मित्रांमध्ये होत असतं. पण संपूर्णपणे सोन्याचा फोन आता बाजारात आला आहे. बाजारात एचटीसी-१ हा स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनला पसंती पण चांगलीच मिळत आहे. याच व्हर्जनचा एचटीसी-१ गोल्डजिनी स्मार्टफोन देखील बाजारात उपलब्ध करण्यात आलाय.
हा स्मार्टफोन पूर्णपणे २४ कॅरेट सोन्याने तयार करण्यात आला आहे. याची किंमत १ लाख ६० हजार ८३३ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.
एचटीसी आधी आय फोन ५ एस, गोल्ड ब्लॅकबेरी, गोल्ड आय पॅड एअर आणि आय पॅड मिनी रेटीना या कंपनीने देखील गोल्डजिनी फोन बाजारात उतरवला होता.
गोल्ड शिवाय एचटीसी-१ हा प्लॅटिनम आणि रोझ गोल्ड प्लेटिंगमध्ये देखील उपलब्ध आहे. एचटीसी-१ प्लॅटिनमची किंमत १ लाख ७७ हजार ८३३ रूपये इतकी आहे. गोल्डजिनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर सांगण्यात आलं आहे की, एचटीसी-१ हा सिम फ्री स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सर्व नेटवर्कसाठी उपलब्ध आहे. ग्राहक या फोनला कुठल्याही देशात कुठल्याही नेटवर्कवर वापरू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.