www.24taas.com , लंडन
मानसिक आजारांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या असं लक्षात आलंय, की लेखन करणाऱ्या व्यक्तींना इतर काम करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मानसिक आजारांवर जास्त प्रमाणात उपचार करावा लागतो. या अध्ययनामुळे लेखन आणि स्किझोफ्रेनियातील परस्पर संबंधातील अभ्यास करण्यात आलाय.
स्वीडनच्या कॉरोलिन्स्कॉ इंस्टिट्यूट मधील संशोधकांनी मोठ्या प्रमाणात दहा लाख वीस हजार रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांवर केलेल्या परिक्षेनंतर हा निष्कर्ष काढण्यात आलाय. अध्ययनामुळे अशी माहिती समोर आलीयं कि काही मानसिक आजार जसे बायपोलार डिसऑडर्स, कलात्मक आणि विज्ञानाच्या संबंधित कार्य करत आहेत अशा व्यक्तींमध्ये मानसिक आजार जास्त पसरतात. यांमध्ये नृत्यांगना, संशोधक,फोटोग्राफर, आणि लेखकांचा समावेश आहे.
लेखकांना सिजाफ्रेनिया, डिप्रेशन, अस्वस्थपणा सारखे आजार अधिक उद्भवतात, तसेच सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लेखकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण ५० टक्के जास्त आहे. डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एपिडिमॉलॉजी एन्ड बायोस्टॅटिस्टिक्सच्या कन्सलटन्ट सिमॉन क्यागा यांनी सांगितले, की या अध्ययनाद्वारे मानसिक आजारांबद्दलची माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.