www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
आता गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या नावानं बाजारात नवीन फोन लॉन्च झालाय. गुजरातमधील उद्योगपती अमित देसाई यांच्या कंपनीनं ‘स्मार्ट नमो’ ग्रृपनं फोनचे दोन मॉडेल्स भारतीय बाजारात उतरवले आहेत. दोन्ही फोन अॅन्ड्रॉईड आहेत.
कंपनीच्या वेबसाईटनुसार सध्या या फोनचे ऑर्डर्स फक्त ई-कॉमर्स वेबसाईटवरील स्नॅपडीलवर तुम्ही करू शकता. या फोनचं तुम्ही प्री-बुकिंग करु शकतो जे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या हाती मिळेल. त्यातल्या पहिल्या काही ग्राहकांना नरेंद्र मोदींनी सही केलेला फोन मिळू शकतो.
स्मार्टफोन सॅफरॉन - १ नावाचे फोन १६ जीबी आणि ३२ जीबी मेमरी क्षमतेचे फोन लाँच करण्यात आले आहेत. या फोनची किंमत क्रमश: १८ हजार आणि २३ हजार इतकी आहे. तर स्मार्टफोन सॅफरॉन-२ ची किंमत २४ हजार रुपये इतकी आहे. तर या फोनची इंटरनल मेमरी ३२ जीबी पासून ६४ जीबी (एक्सपांडेबल) आहे. दोन सिमकार्ड टाकू शकत असलेल्या या स्मार्टफोन १३ मेगापिक्सल (मागे) आणि पाच मेगापिक्सल (पुढे) असे कॅमेऱ्याचे लेंस आहेत.
अॅन्ड्रॉईड ४.२ वर आधारित या फोनमध्ये १.५ गेगाहर्ट्सचं क्वाड कोर प्रोसेसर आणि दोन जीबी रॅम आहे. स्मार्टनमो-१ मध्ये पाच इंचाचा आणि स्मार्टनमो-२ मध्ये ६.५ इंचाची डिस्प्ले स्क्रीन आहे. भारतीय बाजारात हा फोन आणणारे अमित देसाई हे चीनमध्येही मोबाईलचा व्यापार करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.