एका सेकंदात डाऊनलोड करा संपूर्ण चित्रपट!

सॅमसंग इलेक्टॉनिक्सने सोमवारी ५ जी मोबाईल तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले असून यामुळे ग्राहकांना एक संपूर्ण चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड करण्याची सुविधा मिळणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 13, 2013, 05:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सेऊल
सॅमसंग इलेक्टॉनिक्सने सोमवारी ५ जी मोबाईल तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले असून यामुळे ग्राहकांना एक संपूर्ण चित्रपट एका सेकंदात डाऊनलोड करण्याची सुविधा मिळणार आहे.
दक्षिण कोरियाच्या या कंपनीने डाटा संप्रेषणाची ५ वी पिढीच्या अतितीव्र वायरलेस परीक्षण केले आहे. या दरम्यान दोन किलोमीटरच्या परिघात प्रति सेकंदाला एक गीगाबाइटपेक्षा अधिक गतीने डाटाची देवाण-घेवाण करण्यात आली.
ही नवीन प्रणाली बाजारात येण्यासाठी २०२० साल उजाडणार आहे. सध्याच्या ४ जी नेटवर्कच्या तुलनेत शंभरपट अधिक गतीने व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा नव्या प्रणालीत उपलब्ध होणार आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहक ३ डी फिल्म, गेम्स तसेच कोणत्याही क्षणाची अल्ट्रा हाय डेफिनेशन (यूएसडी) व्हिडिओ क्षणार्धात प्राप्त करू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.