www.24taas.com, कणकवली
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस अर्थात राणेंच्या विरोधात उतरलेल्या महाआघाडीला अपयश आले आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल काय लागेल याकडे लक्ष होते. राणेंना धक्का मिळणार का, याची उत्सुकता होती. मात्र, राणेंनी पुन्हा बाजी मारली आहे. याठिकाणी मनसेनेने ती उमेदवार उभे केले होते. तर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांच्या आघाडीला यश मिळालेले नाही. १७ जागांच्या पालिकेत काँग्रेस १३ जागांवर तर शिवसेनेला तीन आणि भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
कणकवलीमध्ये नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राणेंना शह देण्यासाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाआघाडी झाली. तर मनसेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र त्यांना प्रभाव पाडता आला नाही. आता स्पष्ट बहुमत मिळाल्याने काँग्रेसला सत्ता आल्याने राणेंनी बाजी मारली.