www.24taas.com, रत्नागिरी
आंब्यानंतर आता कोकणातल्या करवंदांचे भावही वाढणार असंच दिसतंय कारण आता करवंदापासून वाईन तयार करण्याचा शोध कोकण कृषी विद्यापीठाने लावलाय.
‘डोंगराची काळी मैना’ अशी ओळख असलेल्या जंगली करवंदांपासून तयार झालेली वाईन... कोकण कृषी विद्यापीठानं करवंदांपासून बनवलेल्या इतर पदार्थांप्रमाणे वाईन तयार करण्याचा हा शोध लावलाय. त्यामुळे काटेरी झाडाला येणाऱ्या या करवंदांना आता चांगलाच भाव येणार आहे. कारण सरकारच्या मंजुरीनंतर करवंदाच्या वाईनची चव सर्वांना चाखता येणार आहे.
आत्तापर्यंत आपल्यासमोर द्राक्ष, जांभूळ, आंबा, काजूपासून बनवल्या गेलेल्या वाईन्सचे पर्याय होते. मात्र, कोकण कृषी विद्यापीठाला करवंदापासून वाईन तयार करण्यात यश आल्यानं यापुढे करवंदाच्या वाईनची चव वाईन शौकिनांना चाखता येणार आहे.