नानासाहेब धर्माधिकारींचे स्मारक रद्द करा- आप्पासाहेब

महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक रद्द करा अशी मागणी नानासाहेबांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

Updated: Mar 13, 2013, 02:12 PM IST

www.24taas.com, रेवदंडा
महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक रद्द करा अशी मागणी नानासाहेबांचे चिरंजीव आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. नानासाहेबांच्या स्मारकाला विरोध झाल्यानं आप्पासाहेबांनी व्यथित होऊन ही मागणी केल्याचं बोललं जात आहे.
या स्मारकाचं भूमिपूजन ९ एप्रिल २०११ रोजी शरद पवारांच्या हस्ते झालं होतं. १६ कोटी रुपयांचं हे स्मारक ३० एकरांच्या परिसरात होणार होतं. मात्र या प्रकल्पाला मधुकर राऊत आणि काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली.

हायकोर्टानं या स्मारकाच्या बाजुनं निकाल दिला. यानंतर दत्ताजी खानविलकर राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष यांनीही विरोध केला होता. सततच्या विरोधाला कंटाळून नानासाहेबांचे पूत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून स्मारक रद्द करण्याची मागणी केली आहे.