www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनशताब्दी एक्सप्रेसला दोन नॉन एसी तर एक एसी डबा जोडण्यात येणार आहे. ही गाडी १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत धावणार आहे. तर राज्यराणी एक्सप्रेसला दोन जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. राज्यराणी रेल्वे १ एप्रिल ते ३० जून धावेल.
त्याचप्रमाणे दादर-सावंतवाडी विशेष रेल्वे ११ एप्रिल ते ८ जूनपर्यंत सोडण्यात येणार आहे.
दादर-सावंतवाडी विशेष गडी प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी सुटेल. ही रेल्वे दादर येथून सकाळी ७.५०वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे सायंकाळी ६.२० वाजता पोहोचेल. सावंतवाडी-दादर विशेष ट्रेन १२ एप्रिल ते ९ जूनपर्यंत सोडण्यात येणार असून ही ट्रेन प्रत्येक बुधवारी, शनिवारी आणि सोमवारी सुटेल. सावंतवाडी येथून ही रेल्वे पहाटे ५ वाजता सुटेल आणि दादर येथे दुपारी ४.१० वाजता पोहोचेल.
विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप या स्टेशनवर थांबे देण्यात आले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.