थंडीत तुम्हालाही सतावतेय का कंबरदुखीची समस्या?

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरातील हाडे कमजोर असतात. स्त्रियांचे कंबरेचे हाड मात्र त्या मानानं कठिण असतं... पण, अनेक कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीची समस्या सतत सतावत असते. त्यातही थंडीत ही समस्या जरा जास्तच प्रमाणात असते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 1, 2014, 01:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरातील हाडे कमजोर असतात. स्त्रियांचे कंबरेचे हाड मात्र त्या मानानं कठिण असतं... पण, अनेक कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीची समस्या सतत सतावत असते. त्यातही थंडीत ही समस्या जरा जास्तच प्रमाणात असते.

स्त्रियांना का सतावते कंबरदुखीची समस्या
बहुतेकदा वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना कंबरदुखीची समस्या मोठ्याप्रमाणावर सतावते. थंडीमुळे विशेषत: शीत ऋतूमध्ये कंबरेचं दुखणं अधिक वाढत जातं. बराच वेळपर्यंत खुर्चीत बसून एकाच स्थितीत काम केल्यानं कंबरेच्या मांस पेशींवर ताण पडल्यामुळे ही समस्या अधिक प्रमाणात जाणवते. कंबरेच्या हाडातील डिस्क सरकणे किंवा हाडे झिजणे, त्यामुळे टीबीसारखे रोग होणे, वाजवीपेक्षा अधिक वजन उचलणे, कंबरेला धक्का लागणे, अधिक लठ्ठपणा असणे, मलावरोध नेहमी होऊन पोटाला फुगारा येणे, शरीरातील धातू दुर्बलतेमुळे, मानसिक चिंतेमुळे स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर किंवा मासिक पाळी व्यवस्थित न गेल्यामुळे कंबरेचे दुखणं सतत जाणवत राहतं. तसेच हाडांची कमजोरी, हाडांचे कॅन्सर, संधिवात, आमवात, नेहमी झोपून राहणे, कंबरेतील मांसपेशीमध्ये स्पाझम येणे, गर्भावस्थेतसुद्धा कंबरेचे दुखणे येत असते.
काय करता येतील कंबरदुखीवर उपाय
*पाचन विकार दूर करून पोट साफ राहील याची काळजी घ्या.
*अतिश्रमामुळे किंवा जास्त वेळ उभं राहिल्यामुळेही ही समस्या जाणवू शकते. अशा वेळी आराम घ्यावा तसंच अधिक भार उचलू नये.
*टणक बिछान्यावर झोपावं.
*खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, सुका मेवा, सुंठ, लसून इत्यादींचं प्रमाण वाढवावं.
*थंड पदार्थ, थंड पाणी, शिळे अन्न, अधिक मिरची, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचा आहारात समावेश टाळावा.
*कंबरदुखीचा त्रास बराच काळ जाणवत असेल तर डॉक्टरांना भेटा.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.