नवी दिल्ली : स्मार्टफोन जगताता स्टेटस सिंबॉल मानला जाणाऱ्या अॅपलने मागील वर्षी आयफोन-६ लॉंच केला होता. त्याच आयफोन-६ च्या किंमतीत अॅपलने २५०० रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आधी५३,५०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन-६ च्या किंमतीत आणखी वाढ झालेली आहे. मात्र तुम्हाला आयफोन-6 घेण्याची इच्छा असेल तर तो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon.in वर खरेदी केल्यास तुम्हाला घसघसीत ८०००रुपयांची सूट मिळत आहे.
अॅमेझॉनवर आयफोन-6चा १६ जीबी गोल्ड व्हर्जन ४५,४९८ आणि ग्रे व्हर्जन ४५,९७९ रुपयात मिळत आहे. त्यामुळे तुमचे मुळ किंमतीच्या थेट ८००० रुपये वाचणार आहेत.
आयफोन-6 मधील खास फीचर्स :
१) ४.७ इंच की रेटिना HD डिस्प्ले
२) A8 चिपसेट सोबत M8 मोशन कोप्रोसेसर
३) ८ मेगापिक्सलचा iSight कॅमरा, ट्रू टोन फ्लैश सोबत व्हिडियो कालिंगसाठी HD कॅमरा
४) टच आईडी फिंगर प्रिंट स्कॅनर
५) iOS 8 व्हर्जन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.